ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पण 15 खेळाडूंच्या संघात काही खेळाडूंना डावलल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला यापैकीच एक खेळाडू. एशिया कप स्पर्धेनंतर चहलला वर्ल्ड कप स्पर्धेतूनही वगळण्यात आलं आहे.
चहलऐवजी भारतीय क्रिकेट संघात फिरकी गोलंदाज म्हणून चायनामन कुलदीप यादवची निवड करण्यात आली आहे.
सलग तिसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून चहलला वगळण्यात आलं आहे. 2021 चा टी20 वर्ल्ड कपसाठी चहलला संधी देण्यात आली नव्हती. तर 2022 मध्ये संघात असून एका सामन्यात खेळवण्यात आलं नाही.
अशात आता युजवेंद्र चहलने भारताबाहेर जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काऊंटी क्रिकेटमध्ये चहल खेळणार आहे. बीसीसीआयकडून त्याला परवानगी मिळाली आहे.
प्रसिद्ध क्रिकेट क्लब केंट काऊंटीसाठी चहर 3 फर्स्ट क्लास सामने खेळणार आहे. टीम इंडियाला गरज भासल्यास हा करार थांबवून तो भारतात परत येऊ शकतो.
टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह देखील नुकताच केंट काऊंटी क्लबकडून खेळला होता. भारतीय संघाचे कोच राहुल द्रविडही केंट संघासाठी खेळले आहेत.