टी20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या हातातील घड्याळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हे घड्याळ्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
स्टाईलिश आणि आकर्षक दिसणाऱ्या या घड्याळयाची किंमत तब्बल 2 कोटी 16 लाख इतकी आहे. तांत्रिक दृष्ट्याही हे घड्याळ अॅडव्हान्स आहे.
रोहित शर्माच्या मनगटावर जे घड्याळ ते पाटेक फिलिप्स नॉटिलस प्लॅटिनम 5711 ब्रँडचं आहे. या घड्याळ्याच्या मोजक्याच आवृत्त्या आहेत.
रोहित शर्माला महागड्या घड्याळांचा छंद आहे. रोहितकडे एकाहून एक ब्रँडची आणि महागडी घड्याळं आहेत.
रोहित शर्माकडे रोलेक्स, हबलॉट आणि मेस्ट्रो सारख्या प्रीमिअम ब्रँडची घड्याळं आहेत.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेृतृत्वाखाली टीम इंडिया वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये उतरणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी रोहितची पत्रकार परिषद पार पडली.