आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 पासून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मैदानापासून दुर आहे.
मोहम्मद शमीच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर लंडनमध्ये त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून तो मैदानात उतरलेला नाही.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मोहम्मद शमी आता दुखापतीतून सावरतोय. त्याने गोलंदाजीच्या सरावालाही सुरुवात केली आहे.
मोहम्मद शमीने सोशल मीडिआवर एक पोस्ट शेअर केला असून एनसीएच्या ट्रेनिंग नेट्समध्ये तो गोलंदाजी करताना दिसत आहे.
या व्हिडिओत मोहम्मद शमी गोलंदाजी करताना दिसत आहे, पण त्याच्या धावण्यात अद्याप वेग आलेला नाही.
दुखापतीमुळे मोहम्मद शमी टी20 वर्ल्ड कपही खेळू शकला नाही. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत शमी पुनरागमन करेल असं बोललं जात आहे.
मोहम्मद शमीचं पुनरागमन टीम इंडियासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाचं लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम सामना गाठण्याचं आहे.