टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची लाडकी लेक वामिकाचा आज वाढदिवस आहे.

Jan 11,2024


विरुष्काची वामिका तीन वर्षांची झाली. लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने विराट कोहलीन पहिल्या टी20 सामन्यात खेळणार नाहीए.


वामिका तीन वर्षांची झाली, पण आजपर्यंत विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर आपल्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही


वामिकाचा चेहरा कधी पाहिला मिळेल असा प्रश्न एका चाहत्याने विराटला विचारला होता. यावर विराटने यामागच्या कारणाचा खुलासा केला.


जोपर्यंत वामिकाला आपली आवड आणि सोशल मीडियाबाबत कळत नाही तोपर्यंत चेहरा न दाखवण्याचा निर्णय आई-बाबा म्हणून घेतल्याचं विराटने उत्तर दिलं.


11 जानेवारी 2021 मध्ये विराट आणि अनुष्का आई-बाबा झाले. सोशल मीडियावर ही माहिती विराट कोहलीने आपल्या फॅन्सना दिली होती.


'वामिका' या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'देवी दुर्गा'. तसेच 'वामिका' या नावात विराट आणि अनुष्काच्या नावाचे अक्षर देखील आहे.

VIEW ALL

Read Next Story