कसोटी आणि एकदिवसीय मालिकेती विजयानंतर टीम इंडियाला टी20 मालिकेत पराभव स्विकारावा लागला. विंडिजने ही मालिका 3-2 ने जिंकली.
टी20 मालिकेतील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाने दहा मालिका/स्पर्धा गमावल्या आहेत. हा आकडा चिंताजनक आहे.
राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाने WTC फायनल, एशिया कप, टी20 विश्वचषक स्पर्धा गमावली आहे.
परदेशातही टीम इंडियाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला.
बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला होता. तर न्यूझीलंडविरुद्धही एकदिवसीय मालिका गमवावी लागली होती.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला भारतीय भूमितच पराभूत केलं होतं. एकदिवसीय मालिकेत भारताला पराभवाला सामोरं जावं लागंल होतं.