येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यानिमित्ताने जाणून टी20तला सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये पहिल्या स्थानावर आहे बाबर आझम. बाबरने आपल्या नेतृत्वात पाकिस्तानला 78 पैकी 45 सामन्यात विजय मिळवून दिलाय.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन आहे. मॉर्गनने इंग्लंडला 72 पैकी 44 सामन्यात विजय मिळवून दिलाय.
तिसऱ्या क्रमांकावर युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबाच नंबर लागतो. मसाबाच्या नेतृत्वात युगांडा क्रिकेट संघ 56 पैकी 44 सामन्यात जिंकला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने 54 पैकी 42 सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाच सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याच्या नेतृत्वात भारताने 72 पैकी 42 सामन्यात जिंकण्याचा पराक्रमक केलाय.
विराट कोहलीने आतापर्यंत 50 टी20 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलंय, पण यापैकी केवळ 12 सामन्यात त्याला संघाला विजय मिळवून देता आला आहे.