भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 14 जूनदरम्यान खेळवला जाणार आहे.
इंग्लंडच्या ओव्हर मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने येतील.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या संभाव्य अंतिम अकरा खेळाडूंची नावं समोर आली आहेत.
कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला उतरतील. तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानावर खेळेल.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर असेल. तर संघात पुनरागमन केलेल्या अजिंक राहाणेला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं जाईल
ईशान किशनला या संघानत स्थान नसेल, त्याच्याऐवजी केएस भरतला विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून संधी मिळू शकते.
ओव्हलच्या मैदानावर स्पिनर्सला मदत मिळू शकते. अशात रविंद्र जडेजाच्या जोडीला अनुभवी आर अश्विनला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकाणाऱ्या मोहम्मद शमीवर भारतीय संघाच्या गोलंदाजीची मदार असेल.
शमीच्या जोडीला शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजांची धुरा सांभाळतील.
जयदेव उनाडकट, उमेश यादव आणि अक्षर पटेलला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर राहावं लागण्याची शक्यता आहे.