ग्लेन मॅक्सवेल याने अफगाणिस्तानविरुद्घ 201 धावांची वादळी खेळी केली अन् इतिहास रचला आहे.
मॅक्सवेलने या सामन्यात 128 बॉलमध्ये 201 धावांची वादळी खेळी केली. त्यात 21 फोर अन् 10 गगनचुंबी सिक्स होते.
या वादळी खेळीसह मॅक्सवेलने अनेक विक्रम मोडले आहेत. मॅक्सवेलने वर्ल्ड कपमधील तिसरं दुहेरी शतक झळकावलं आहे.
मॅक्सीआधी मार्टिन गप्टिल याने 2015 मध्ये 237 धावांची खेळी केली होती. तर ख्रिस गेल याने 215 धावांची वादळी खेळी केली होती.
त्यानंतर आता मॅक्सवेलने 201 धावा करत मोठा विक्रम रचला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये डबल सेंच्यूरी मारणारा तो पहिला मिडल ऑर्डर खेळाडू आहे.
तर वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत त्याने पाचवं स्थान देखील पटकावलंय.