म्हणाले 'रोहित शर्मासोबत जर...'
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 352 धावांचा डोंगर उभा केलाय.
सलामीवीर इशान किशन अन् शुभमन गिल आजच्या मॅचमध्ये नसल्याने सलामीसाठी कोण येणार? असा सवाल विचारला जात होता.
ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी भविष्यवाणी केली होती. ती आता खरी ठरताना दिसत आहे. नेमकं काय म्हणाला भोगले पाहा...
भारताला त्यांच्या विश्वचषकाच्या फलंदाजांनी विश्वचषकात ज्या स्थानावर स्थान मिळण्याची शक्यता आहे तेथं फलंदाजी करावी अशी इच्छा हर्षा भोगले यांनी व्यक्त केली होती.
त्यामुळे कोहली, श्रेयस आणि केएल राहुलसह 3,4 आणि 5 नंबरवर फलंदाजी करायला कोणीतरी खालून सलामीची गरज आहे, असं हर्षा भोगले म्हणाले.
वॉशिंग्टन सुंदरने याकडे एक उत्तम संधी म्हणून पाहिलं पाहिजे, असं हर्षा भोगले म्हणाले होते अन् अपेक्षेप्रमाणे वॉशिंग्टन सुंदर सलामीसाठी मैदानात उतरला.