नुकतंच अक्षर पटेलच्या जागी 37 वर्षीय अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची भारकाक होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 साठी भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली.
दरम्यान यावेळी आर. अश्विनलाच का संधी देण्यात आली हा प्रश्न समोर येतोय.
बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वेबसाईलटला दिलेल्या माहितीनुसार, खेळण्याचा प्रचंड अनुभव असलेल्या रविचंद्रन अश्विनवर विश्वास ठेवण्याशिवाय भारतीय टीमकडं कोणताच पर्याय नव्हता.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मानं अश्विनला भेटण्यासाठी बोलावलं होतं. परंतु अश्विननं सामन्यात फिट होण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितला होता.
दरम्यान त्यानंतर अश्विनचा समावेश करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आता चार वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त एक ऑफ-स्पिनर आणि डावखुरा स्पिनरसह टीम परिपूर्ण दिसतेय.
भारत 8 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. चेन्नईमध्ये टीम इंडिया पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे.