बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला आहे.
आपल्या गोलंदाजीवर फलंदाजाने लगावलेला फटका पायाने अडवताना हार्दिकच्या पायाला दुखापता झाली.
ही दुखापत गंभीर असल्याने हार्दिक पांड्याला भर सामन्यातून मैदान सोडावं लागलं. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं तिथे त्याच्या पायाचा स्कॅन करण्यात आला.
हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर असल्यास तो वर्ल्ड कपमधल्या काही सामन्यांना मुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशाच त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.
विश्वचषकात हार्दिक पुढील काही सामन्यात खेळू शकला नाही तर त्याच्या जागी आर अश्विनला संधी मिळू शकते. अश्विन गोलंदाजीबरोबर उपयुक्त फलंदाजही आहे.
किंवा टीम इंडियात सूर्यकुमार यादवला संधी देऊ आणखी एक फलंदाज वाढवण्याची शक्यता आहे. अशात रोहित किंवा विराट सहाव्या गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतात.
अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीचा पर्यायही टीम इंडियासमोर उपलब्ध आहे. बुमराह आणि सिराजच्या जोडीला शमी आल्यास वेगवान गोलंदाजी भक्कम होऊ शकते.