भारतात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जातेय. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहाही संघांचा प्रत्येकी एक सामना झालाय.

Oct 09,2023


भारतातल्या दहा स्टेडिअममध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जातायत. अशात एक नवा वाद उभा राहिलाय.


न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. 10 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे.


पण सामन्याआधी इंग्लिश कर्णधाराच्या एका वक्तव्याने विश्वचषक स्पर्धेत नवा वाद उभा राहाण्याची शक्यता आहे.


पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने धरमशालेतलं हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचं स्टेडिअम खराब असल्याचं म्हटलंय.


या मैदानात क्षेत्ररक्षणादरम्यान खेळाडूंना उडी मारताना काळजी घ्यावा लागणार आहे. मैदानाच्या आऊटफिल्डबाबत मला चिंता वाटते असं बटलरने म्हटलंय.


माझ्या मते हे मैदान खराब आहे, इथं क्षेत्ररक्षणादरम्यान खेळाडूंना नुकसान होऊ शकतं, त्यामुळे खबरदारी बाळगावी लागणार आहे असंही बटलर यांने म्हटलंय.

VIEW ALL

Read Next Story