आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया रविवारी बलाढ्य न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. हिमाचलप्रदेशमधल्या धरमशालेत हा सामना रंगणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड दोनही संघ या स्पर्धेत अपराजीत आहेत. त्यामुळे विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
विश्वचषक पॉईंटटेबलमध्ये न्यूझीलंड पहिल्या स्थानावर तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. दोनही संघांच्या खात्यात प्रत्येकी चार विजयांसह आठ पॉईंट जमा आहेत.
या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोनही संघ धरमशालेत दाखल झालेत. आणि खेळाडूंनी सरावही केला. यादरम्यान टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला
टीम इंडियाच्या सरावात अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. युवा विकेटकिपर आणि फलंदाज इशान किशनचा मशमाश्यांनी चावा घेतला.
ईशान किशन फलंदाजीचा सराव करत असताना मधमाशींनी त्याला चावा घेतला. यानंतर ईशान किशन सराव सोडून हॉटेलवर परतला.
विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात ईशान किशनला संधी देण्यात आली होती. पण तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर पुढच्या तीनही सामन्यात त्याला बेंचवर बसावं लागलंय.