आयसीसी वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. पहिल्या चार स्थानातही पाकचा समावेश नाही
मैदानावर बाबर ब्रिगेडची कामगिरी सुमार होतेय, पण मैदानाबाहेरही पाकिस्तान क्रिकेट संघात सर्वकाही आलबेल नाहीए
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमचा WhatsApp चॅट लाईव्ही टेलिव्हिजनवर लीक करण्यात आलाय. बाबर आझम आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीओओ सलमान नसीर यांच्यातील आहे.
या चॅटमध्ये सलमान नसीर म्हणतायत, 'बाबर अशा बातम्या पसरल्या आहेत की तू पीसीबी चेअरमनला फोन केला होता, आणि त्यांनी उत्तर दिलं नाही, तू फोन केला होतास का?'
यावर बाबर आझमने उत्तर दिलंय, 'सलाम सलमान भाई, मी सरांना असा कोणताही कॉल केलेला नव्हता'
पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने बाबर आझमचं वैयक्तिक चॅट लीक झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'कृपया बाबरला एकटं सोडा, तो पाकिस्तान क्रिकेटची संपत्ती आहे' असं वकारने म्हटलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये जागा मिळवू शकला नाही, तर बाबर आझमचं कर्णधारपद जाऊ शकतं असे संकेत नुकतचे पीसीबीने दिले होते.