आयसीसी विश्वचषकातल्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप आला. बाबर आझमने पाकिस्तान संघाच्या क्रिकेटपदाचा राजीनामा दिला.
बाबर आझमने सोशल मीडियवर पोस्ट लिहित राजीनाम्याची घोषणा केली. क्रिकेटच्या तीनही प्रकारातून बाबरने राजीनामा दिला आहे.
बाबर आझमने राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन फॉर्मेटसाठी दोन वेगळ्या कर्णधारांच्या नावाची घोषणा केली.
पाकिस्तान कसोटी संघाच्या कर्णधारपदी स्टार फलंदाज शान मसूद तर टी20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. एकदिवसीय क्रिकेटसाठी कर्णधार कोण असणार याची मात्र पीसीबीने माहिती दिलेली नाही.
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर्सच्यामते एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदासाठी तिसऱ्या खेळाडूची नियुक्ती केली जाईल. म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी20 साठी तीन वेगळे कर्णधार असतील.
शान मसूद हा कसोटी खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने 30 कसोटी सामन्यात 1597 धावा केल्या एहात. तर 9 एकदिवसीय सामन्यात 163 धावा त्याच्या नावावर आहेत.
तर शाहिन शाह आफ्रिदीने 53 एकदिवसीय सामन्यता 104 विकेट घेतल्या आहेत. तर 27 कसोटीत त्याच्या नाववर 105 विकेट जमा आहेत.