ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने धरमशालाच्या मैदानावर धावांचा अक्षरश: पाऊस पाडला.


विश्चचषकात आपला पहिला सामना खेळणाऱ्या हेडने 67 चेंडूनत 109 धावा केल्या. यात सात षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.


डेव्हिड वॉर्नरने पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने अवघ्या 65 चेंडूत 1 धावा केल्या. वॉर्नर-हेडने पहिल्या विकेटसाठी 19.1 षटकात 175 धावा कुटल्या.


ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान क्रिकेटच्या इतिहासातील एक अजब घटना घडली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अवघ्या दोन चेंडूत 21 धावा केल्या.


सामन्याच्या तिसऱ्या षटकात मॅट हेनरीच्या पहिल्या चेंडूवर वॉर्नरने षटकार लगावला. दुसरा चेंडू हेनरीने नो बॉल टाकला. ज्यावर वॉर्नरने एक धाव घेतली. तर त्यानंतर टाकलेल्या फ्री हिट चेंडूवर हेडने षटकार लगावला.


फ्री हिट चेंडूवरही हेनरीने पुन्हा नो बॉल टाकला. पुन्हा फ्री बॉलावर हेडने षटकार लगावला. म्हणजे दोन अधिकृत चेंडूवर एकूण 21 धावा मिळाल्या.


ऑस्ट्रेलियाने 49.2 षटकात 388 धवांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडतर्फे ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

VIEW ALL

Read Next Story