विश्चचषक स्पर्धेत चार सामन्यात बेंचवर बसून काढलेल्या मोहम्मद शमीला पाचव्या सामन्यात मैदानात उतरण्याची संधी मिळाली.
मिळालेली संधी मोहम्मद शमीने हातची जाऊ दिली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात 54 धावात शमीने 5 विकेट घेतल्या. प्लेअर ऑफ द मॅचचा तो मानकरी ठरला
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केल्यानतंरही शमीला पुढच्या म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संधी मिळणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
टीम इंडियाचा पुढचा सामना लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
पहिला बदल म्हणजे सूर्यकुमारच्या जागी हार्दिक पांड्या टीम इंडियात कमबॅक करेल. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ताच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे न्यूझीलंविरुद्धचा सामना तो खेळू शकला नाही.
लखनऊची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियात अनुभवी आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन वेगवान गोलंदाज असतील.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्द सिराज हे संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत, यांच्यापैकी एकालाही बाहेर बसवण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. त्यामुळे शमीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.