विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाईल.
टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे. शुभमनला डेंग्यूची लागण झालीय. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याची उणीव जाणवेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कोण करणार हा प्रश्न आहे.
गिल आजारी असल्याने त्याचा मित्र ईशान किशनला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माबरोबर ईशान भारतीय डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
गिल मोठी खेळी करण्यासाठी ओळखल जातो. तर ईशान आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सलामीला येत डबल सेंच्युरी करण्याचा विक्रम ईशान किशनच्या नावावर जमा आहे.
ईशान किशनला प्लेईग XI मध्ये संधी मिळाल्यास टीम इंडियाला डावखुऱ्या खेळाडूचा पर्याय मिळणार आहे. उजव्या आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकते.
शुभमन गिल कधीपर्यंत बरा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित होतोय. डेंग्यूतून पूर्ण बरं होण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा अवधी लागतो. असं झाल्यास गिलला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही बाहेर बसावं लागू शकतं.