भारताचा बॅडमिंटन स्टार सात्विक साईराज रंकी रेड्डी याने सर्वात वेगवान स्मॅश मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

Jul 19,2023


सात्विकने 565 किलोमीटर प्रतितास वेगाने स्मॅश मारत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं.


सात्विकने 10 वर्ष जुना रेकॉर्डही मोडला. 2013 मध्ये मलेशियाच्या खेळाडूच्या नावावर हा रेकॉर्ड होता


मलेशियाच्या टॅन बून हेओंगने 493 किमी वेगाने स्मॅशन मारला होता.


महिला बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान स्मॅश मारण्याचा विक्रम मलेशियाच्या पिअर्ली टॅनच्या नावावर आहे. तीने 438 किमी वेगाने स्मॅश मारला होता.


सात्विक साईराजने योनेक्स बॅडमिंटन स्पर्धेत हा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने याला दुजोरा दिलाय


त्याआधी भारताच्याच लक्ष्य सेनेने कॅनाडा ओपनच्या अंतिम फेरीत 420 किमी वेगाने स्मॅश मारला होता.


सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने नुकतंच इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेचा खिताब आपल्या नावावर केला.


सात्विकने वेगवान स्मॅशचा रेकॉर्ड 14 एप्रिल 2023 मध्ये योनेक्स फॅक्टरी जिम्नेजियममध्ये केला होता.


सात्विक मूळचा आंध्र प्रदेशातील अमलापुरम जिल्ह्यातील आहे. तो दुहेरी आणि मिश्र दुहेरीत खेळतो.

VIEW ALL

Read Next Story