मुंबईसाठी दुहेरी झटका

हॅमस्ट्रींगच्या समस्येमुळे झाय रिचर्डसनने ऑप्रेशनही करुन घेतलं आहे. त्यामुळेच तो आयपीएलमधून बाहेर आहे. आयपीएलनंतरच्या अॅशेज सिरीजमध्येही हा ऑस्ट्रेलियन खेळाडून खेळणार नाही असं समजतंय. मात्र झाय रिचर्डसनही आयपीएलबाहेर पडल्याने मुंबईला दुहेरी झटका बसला आहे.

Mar 15,2023

झाय रिचर्डसन

मुंबईच्या संघात बुमराहच्या जागी झाय रिचर्डसनची वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र तो सुद्धा दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकणार नाही.

न्यूझीलंडमध्ये बुमराहने केलं ऑप्रेशन

बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असल्याने तो संघातून बाहेर आहे. त्याने न्यूझीलंडमध्ये जाऊन ऑप्रेशनही करुन घेतलं आहे. मात्र तो 2023 चं आयपीएल खेळणार नाही हे निश्चित आहे.

जसप्रित बुमराह

मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह यांच्या पर्वात एकही सामना खेळणार नाही. आशिया चषक 2022 नंतर तो संघातून बाहेरच आहे.

पायाला दुखापत

कार अपघातातून ऋषभ पंतचा जीव थोडक्यात बचावला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तो यंदाच्या सीझनमध्ये खेळणार नसल्याने दिल्लीचं नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे जाण्याची शक्यता आहे.

ऋषभ पंत

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही यंदाच्या आयपीएलमधून बाहेर आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातात पंत गंभीर जखमी झाल्याने मैदानापासून दूर आहे.

मागील पर्वात ठरला होता महागडा खेळाडू

मागील पर्वात कमिन्सला विशेष कामगिरी करता आली नव्हती. कमिन्स कोलकात्याच्या संघासाठी फारच महागडा खेळाडू ठरला होता.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार पॅट कमिन्स हा यंदाच्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार होता. मात्र व्यस्त शेड्युलमुळे त्याने आयपीएलमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. कमिन्स यंदाच्या पर्वात दिसणार नाही.

अनेक महिने मैदानापासून दूर

दुखापतीमुळे प्रसिद्ध कृष्णाचं नुकतंच ऑप्रेशन झालं आहे. त्यामुळे तो पुढील अनेक महिने मैदानापासून दूर असेल. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या असल्याने त्याच्यावर ऑप्रेशन करण्यात आलं.

प्रसिद्ध कृष्णा

आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयर्सच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचं योगदान देणारे प्रसिद्ध कृष्णा यंदा राजस्थानकडून आयपीएल खेळू शकणार नाही.

CSK कडून खेळणार होता

ऑप्रेशन झाल्याने काइल सध्या मैदानापासून दूर आहे. मागील वर्षी बंगळुरुकडून खेळलेला काइल यंदा चेन्नईच्या संघाकडून खेळणं अपेक्षित होतं. मात्र त्याला अजून एक वर्ष तरी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

काइल जेमीसन

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसन यंदाच्या म्हणजेच 2023 चं आयपीएल पर्व खेळणार नाही.

VIEW ALL

Read Next Story