कमाईत धोनीच किंग

धोनीने आयपीएलमधून आतापर्यंत 176 कोटी 84 लाख रुपयांची कमाई केली आहे.

Mar 29,2023

महेंद्रसिंग धोनी

आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीमध्ये धोनी पहिल्या क्रमांकावर आहे यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. 2012 ते 2018 दरम्यान धोनी प्रत्येक पर्वासाठी 15 कोटी रुपये मानधन घ्यायचा. मागील 2 पर्वांमध्ये त्याने 12 कोटी मानधन घेतलं आहे.

रोहितची घसघशीत कमाई

मागील 15 वर्षांच्या कालावधीमध्ये रोहितने आयपीएलमधून तब्बल 162 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे जाहिरातींमधून होणाऱ्या कमाईचा यात समावेश नाही. रोहितने 2022 सालासाठी 16 कोटींचं मानधन घेतलं होतं.

रोहित शर्मा

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख असणाऱ्या रोहितने आयपीएल कमाईच्याबाबतीत विराट कोहलीलाही मागं टाकलं आहे. रोहितने मुंबईला 5 वेळा चषक जिंकून दिला आहे.

विराटची विराट कमाई

विराटने आतापर्यंतच्या सर्व पर्वांमध्ये 158 कोटी 20 लाख रुपयांची कमाई केली आहे. 2018 ते 2021 दरम्यान तो प्रत्येक पर्वासाठी 17 कोटी मानधन घेत होता. मागील वर्षीचं त्याचं मानधन 15 कोटी होतं.

विराट कोहली

आयपीएल चषक जिंकण्यात आलेलं अपयश आणि विराट कोहली याबद्दल क्रिकेट चाहत्यांनी अनेकदा चर्चा केली आहे. 2008 पासून आतापर्यंत सर्व पर्वांमध्ये विराट खेळला आहे.

रैनाने किती रुपये कमवले?

2008 पासून आयपीएल खेळणाऱ्या रैनाने या स्पर्धेमधून एकूण 110 कोटी 74 लाखांची कमाई केली. त्याच्या शेवटच्या पर्वामध्ये त्याने 11 लाखांचं मानधन घेतलं होतं.

सुरेश रैना

चेन्नईच्या संघाकडून आयपीएल खेळणारा रैना हा या स्पर्धेतील खास खेळाडू ठरला. आतापर्यंतच्या पर्वांपैकी केवळ मागच्या पर्वात म्हणजेच 2022 मध्ये तो खेळला नाही.

डिव्हिलियर्सच्या कमाईचा आकडा

मागील पर्वापर्यंत डिव्हिलियर्सने आयपीएलमधून तब्बल 100 कोटी 51 लाख 65 हजार रुपये कमवले. यामध्ये जाहिरातींच्या रक्कमेचा समावेश आहे. मागील पर्वासाठी त्याने 11 कोटी मानधन घेतलं.

एबी डिव्हिलियर्स

दक्षिण आफ्रिकेचा हा माजी कर्णधार भारतामध्ये त्याच्या स्वत:च्या देशापेक्षा अधिक लोकप्रिय आहे. मिस्टर 360 डिग्री नावाने तो ओळखला जातो.

आकडेवारी पाहून व्हाल थक्क

मात्र आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? यापैकी अनेक खेळाडूंची कमाई पाहून तुम्हाला धक्का बसेल. तुम्हाला या खेळाडूंची कमाई माहिती नसेल तर चला जाणून घेऊयात या स्पर्धेतून भरपूर कमाई करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंबद्दल...

पैशांचा पाऊस पाडणारी स्पर्धा

आयपीएलचं यंदाचं पर्व 31 मार्च 2023 पासून सुरु होत आहे. या स्पर्धेकडे खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडणारी स्पर्धा म्हणून पाहिलं जातं.

VIEW ALL

Read Next Story