इंडियन प्रिमिअर लिग 2024 साठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे.
यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये तब्बल 333 खेळाडू लिलावामध्ये सहभागी होणार आहेत.
मात्र आयपीएलमधील खेळाडूंच्या केवळ 77 जागाच शिल्लक आहेत.
त्यामुळेच यंदाच्या लिलावामध्ये बरेच खेळाडू अनसोल्ड राहणार आहेत. असे खेळाडू कोणते ते पाहूयात...
मागील वर्षीच्या आयपीएलमध्ये सहभागी न झाल्याचा फटका ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथला बसू शकतो.
यंदाच्या पर्वात स्टीव्ह स्मिथवर कोणी बोली लावण्याची शक्यता कमीच आहे.
उमेश यादवने मागील पर्वामध्ये सुमार कामगिरी केली होती. मात्र यंदा त्याने आपली बेस प्राइज फार ठेवली आहे.
कामगिरी पाहता उमेश यादवसाठी बेस प्राइज 2 कोटी रुपये कोणताही संघ मोजेल असं चित्र सध्या तरी दिसत नाही.
हर्षल पटेलला यंदा आरसीबीने करारमुक्त केलं आहे. मात्र या वेगवान गोलंदाजाला आता कोणी संघात घेईल असं वाटत नाही.
2024 साठी हर्षलने आपली बेस प्राइज 2 कोटी इतकी ठेवली असल्याने तो अनसोल्डच राहील अशी दाट शक्यता आहे.
हनुमा विहारीलाही आयपीएल 2024 साली कोणी विकत घेईल असं चित्र दिसत नाही. तो एक उत्तम कसोटीपटू आहे.
हनुमा विहारी 2019 पासून एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. त्यामुळे तो अनसोल्ड राहण्याची शक्यताच अधिक आहे.
केदार जाधवने आपली बेस ब्राइज 2 कोटी रुपये ठेवली आहे. मात्र तो बऱ्याच काळापासून या लीग क्रिकेटपासून दूर आहे.
केदार जाधवसाठी संघ मालक एवढा पैसा मोजतील का? हा चर्चेचा विषय आहे. मागील पर्वातही केदारला बंगळुरुकडून खेळताना चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळे तो अनसोल्डच राहील अशी चर्चा आहे.