आयपीएलच्या यंदाच्या लिलावात सर्वात जास्त रक्कम ही आरसीबीकडे असणार आहे. त्यांच्याकडे 40.75 कोटी लिलावासाठी असतील.
बंगळुरूनंतर सर्वात जास्त रक्कम कोणाकडे असेल तर ती सनरायजर्स हैदराबादकडे असेल. त्यांच्याकडे 34 कोटी शिल्लक आहेत.
तब्बल 13 खेळाडूंना रिलीज केल्यानंतर आता केकेआरच्या पर्समध्ये 32.7 कोटी रुपये आहेत.
धोनीची चेन्नई देखील यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी बोली लावू शकते. त्यांच्या खात्यात 31.4 कोटी उरलेले आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी देखील लिलाव फायद्याचा ठरू शकतो. त्यांच्याकडे 29.1 कोटी शिल्लक आहेत.
दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतच्या आगमनानंतर आता कोणत्या खेळाडूंना संघात घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यांच्याकडे 28.95 कोटी बाकी आहेत.
मुंबई इंडियन्ससाठी लिलावात खास काही असेल, असं वाटत नाही. एमआयकडे 15.25 कोटी असल्याने त्यांना उर्वरित खेळाडूंवर अवलंबून रहावं लागेल.
राजस्थानने आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना सोडलं नसल्याने आता त्यांच्या पर्समध्ये 14.5 बाकी आहेत.
लखनऊ जायंट्सने आपल्या टीममध्ये मोठे बदल केले नाही. मात्र, गंभीर नसल्याने लिलावात 13.9 कोटी असेलली लखनऊ कोणती बाजी खेळणार?
यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात कमी रक्कम ही गुजरात टायटन्सकडे असणार आहे. गुजराकडे फक्त 13.85 कोटी शिल्लक आहेत.