चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2024 मध्ये व्यस्त आहे. यंदाच्या हंगामात तो विकेटकिपर म्हणून संघात सहभागी झालाय.

Apr 11,2024


आयपीएलच्या सतराव्या हंगामाच्या सुरुवातीलाच एम एस धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईची धुरा सोपवण्यात आली.


यादरम्यान एमएस धोनीशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. धोनीबरोबर सावली सारखा राहाणाऱ्या त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी नोएडातून मिहिर दिवाकरला अटक केली आहे. याला कारण ठरलं ते एम एस धोनीने केलेली तक्रार. धोनीने मीहिरवर फसवणूकीचा आरोप केला आहे.


धोनी आणि मीहिर कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. तेव्हापासून त्यांची पक्की मैत्री झाली. मिहिर स्वत: माजी क्रिकेटपटू होता आणि धोनीचा बिझनेस पार्टनरही होता.


धोनी आणि मिहिरने क्रिकेट अकॅडेमी सुरु केली होती. याअंतर्गत अरका स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा डायरेस्टर मिहिर आणि धोनीत करात झाला. पम ही क्रिकेट अकॅडमी सुरुच झाली नाही.


यानंतर धोनीने मिहिरविरुद्ध करारातील अटींची पूर्तता न करणं आणि 16 कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोप करत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मिहिर आणि पत्नी सौम्या दासला जयपूर पोलिसांनी अटक केली.

VIEW ALL

Read Next Story