120 बॉलमध्ये 314 रन.. MI vs SRH नाही तर 'हा' सामना 'हायस्ट टीम स्कोअर'च्या यादीत पहिल्या स्थानी

Swapnil Ghangale
Mar 29,2024

डोळ्याचं पारणं फेडलं

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये 27 मार्च रोजी झालेल्या सामन्यामध्ये धावांचा, षटकारांचा आणि विक्रमांचा पाऊस पडला. बुधवारी झालेल्या या सामन्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं.

523 धावा कुटल्या

मुंबई आणि हैदराबादच्या संघाने एकूण 523 धावा कुटल्या. या सामन्यामध्ये विक्रमी 38 षटकार लगावण्यात आले.

500 धावांचा टप्पा ओलांडण्याची पहिलीच वेळ

कोणत्याही टी-20 सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून 500 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

नक्कीच आश्चर्य वाटेल

मात्र मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यातील धावसंख्या ही एका संघाने केलेली टी-20 मधील सर्वोच्च नाही असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

सर्वाधिक धावसंख्या झालेले टॉप 5 टी-20 सामने कोणते?

सर्वाधिक धावसंख्येचा विचार केल्यास मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना चौथ्या स्थानावर आहे. सर्वाधिक धावसंख्या झालेले टॉप 5 टी-20 सामने कोणते ते पाहूयात...

भारतातीलच सामना टॉप 5 मध्ये पाचव्या स्थानी

सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 2023 मध्ये पंजाब विरुद्ध आंध्रप्रदेश सामन्यात पंजाबने 275 धावा केल्या होत्या. 6 विकेट्सच्या मोबदल्यात त्यांनी एवढ्या धावा केल्या.

मुंबई विरुद्ध हैदराबाद चौथ्या स्थानी

27 मार्च 2024 च्या आयपीएल सामन्यातील मुंबई विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात सनरायझर्सने 20 ओव्हरमध्ये 277 धावा केल्या.

4 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा

झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्कीदरम्यान झालेल्या 2019 च्या सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या संघाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या होत्या.

अफगाणिस्तानही या यादीत

2019 साली झालेल्या अफगाणिस्तानविरुद्ध आयर्लंड सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केलेल्या.

एकाच संघाने गाठला 300+ चा टप्पा

2023 साली झालेला नेपाळ विरुद्ध मंगोलीया हा सामना टी-20 मध्ये एकाच संघाने सर्वाधिक धावा करणारा सामना ठरला.

या संघाने केल्या 314 धावा

मंगोलियाविरुद्ध नेपाळच्या संघाने 3 गड्याच्या मोबदल्यात 120 बॉलमध्ये तब्बल 314 धावा केलेल्या.

VIEW ALL

Read Next Story