इंडियन प्रीमियर लीग 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. लिलावासाठी केवळ 77 स्लॉट रिक्त आहेत.
मुंबईने नुकताच रोहित शर्माला डच्चू देत हार्दिक पांड्याच्या खांद्यावरून कॅप्टन्सीची जबाबदारी दिली आहे.
मुंबई इंडियन्स आपली गोलंदाजी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने लिलावात उतरेल. मुंबई इंडियन्स तीन गोलंदाजांवर मोठी बाजी लावू शकते.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याच्यावर पलटणची नजर असेल. कोएत्झीने वर्ल्ड कपमध्ये 20 विकेट घेतल्या होत्या.
डावखुरा गोलंदाज बुरॉन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. बुरानने दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये चमक दाखवली होती.
श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा याच्यावर मुंबई इंडियन्स डाव लावण्यासाठी उत्सुक आहे. हसरंगाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळले असून त्यात त्याने 35 विकेट घेतल्या आहेत.