आयपीएल 2024 च्या 21 व्या मॅचमध्ये चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईविरूद्ध कोलकाता हा सामना खेळला गेला, या सामन्यात चेन्नईचा कॅप्टन ऋतुराजने 67 धावांची उत्कृष्ट इनिंग खेळली.

Apr 10,2024


ऋतुराजसोबत शिवम दुबे याने पण चांगल्या पद्धतीने कर्णधाराचे साथ देत 18 बॉलमध्ये 28 धावांची ताबडतोब खेळी खेळली.


पण चेन्नईने केकआरविरूद्ध फक्त सामनाचं जिंकला नाही तर यासोबतच अनेक रेकॉर्डसुद्धा तोडले आहेत. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने 5 वर्ष जूना रेकॉर्ड तोडला आहे.


ऋतुराजने केकेआरविरूद्धच्या सामन्यात 58 बॉलमध्ये 67 धावांची अर्धशतकीय इनिंग खेळली, या अर्धशतकाने गायकवाड मागील 5 वर्षात चेन्नईकडून अर्धशतक बनवणारा पहिला कर्णधार बनला.


याआधी आयपीएल 2019 मध्ये एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टन्सी करत असताना शेवटचे अर्धशतक लावले होते.


आयपीएल 2022 मध्ये देखील धोनीने अर्धशतक बनवले होते, पण त्यावेळेस रवींद्र जडेजा हा सीएसकेचा कर्णधार होता.


केकेआरच्या विजयानंतर गायकवाडला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा मिळाला, या अवॉर्डसोबत गायकवाडने एकूण 10 प्लेयर ऑफ द मॅचअवॉर्ड जिंकले आहेत आणि यामुळे तो चेन्नईकडून चौथा सर्वात जास्त प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकणारा खेळाडू सुद्धा बनला आहे.

VIEW ALL

Read Next Story