येत्या 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.
BCCI ने नुकतंच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलंय.
यावेळी बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही.
दरम्यान उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होतील, अशी अटकळ बांधली जात होती.
परंतु बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या स्पर्धेचे उर्वरित सामने भारतातच होतील, असं सांगितलंय.
जय शहांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित आयपीएल परदेशात होणार नाही, स्पर्धेचे उर्वरित सामने भारतातच होतील.