मुंबई इंडियन्सच्या संघाचा आयपीएल 2024 च्या पहिल्या सामनात पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधारपदावरुन चर्चा होत आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईला पराभवाचं तोंड पहावं लागल्याने रोहितकडून कर्णधार पद काढून घेण्याचा निर्णय चुकला की काय अशी चर्चा आहे.
त्यातच मैदानात हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मामध्ये बिनसल्याचं चित्र दिसल्याने उलट-सुलट चर्चा सुरु असतानाच सुरेश रैनाचं एका विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रोहित शर्मा हा मुंबईच काय तर सर्वच्या सर्व संघांचा कर्णधार आहे, असं विधान करताना सुरेश रैनाने या विधानामागील कारणही स्पष्ट केलं आहे.
"त्याला (रोहितला) ठाऊक आहे की 2 महिन्यांनंतर त्याला आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ निवडायचा आहे," असं सुरेश रैना कॅमेंट्रीदरम्यान म्हणाला.
"हा टी-20 वर्ल्ड कप 2024 साठीचा भारतीय संघ तो (रोहित) सध्याच्या आयपीएलच्या 10 संघांतील खेळाडूंमधूनच निवडणार आहे," असंही रैनाने नमूद केलं.
"त्यामुळेच तांत्रिक दृष्ट्या पहिल्यास तो सर्व 10 आयपीएल संघाचा कर्णधार आहे," असंही रैना म्हणाला.