'या' खेळाडूचं नाव चर्चेत!
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या झालेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाला पराभवाचं तोंड पहावं लागलं.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला मालिका गमवावी लागल्याने आता हार्दिक पांड्या ट्रोल होत असल्याचं दिसतंय.
तर हार्दिक पांड्याकडून उपकर्णधारपद काढून घ्यावं, अशी मागणीने जोर धरला आहे. त्याचबरोबर सिलेक्टर्स देखील उपकर्णधाराबाबत विचार करण्याची शक्यता आहे.
हार्दिकऐवजी जसप्रीत बुमराह याची टीम इंडियाचं उपकर्णधारपदी वर्णी लागू शकते.
जसप्रीत बुमराह 11 महिन्यांनी दुखापतीतून सावरल्यानंतर आता आयर्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.
जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी टेस्ट मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे त्याच्याकडे आगामी उपकर्णधार म्हणून पाहिलं जाऊ शकतं.
हार्दिक पंड्या टी-20 क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा विचार करता बुमराह पर्याय असू शकतो का? याचा विचार देखील बीसीसीआयला करावा लागणार आहे.