आयसीसी वनडे वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
कर्णधार केन विल्यमसन या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळतेय.
न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टेड यांच्या सांगण्यानुसार, विलियम्सन हा गुडघ्याच्या दुखापतीतून कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. यावेळी तो इंग्लंडविरुद्धचा वर्ल्डकपचा उद्घाटन सामना खेळणार नसल्याची शक्यता आहे.
शुक्रवारी हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाज म्हणून खेळणार असून सोमवारी तिरुवनंतपुरममध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात फिल्डींग आणि फलंदाजी करणार आहे, अशी त्यांनी माहिती दिलीये.
आयपीएलदरम्यान विलियम्सनच्या गुडघ्याला गंभार दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती
विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये.