घरच्या मैदानावर जिंकवून देणार World Cup
2011 मध्ये टीम इंडियाने 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळेस श्रीकांत हे भारतीय संघाचे चिफ सिलेक्टर होते.
माजी क्रिकेटर आणि 1983 च्या विश्वचषक संघाचा भाग असलेल्या कृष्णाचारी श्रीकांत यांनी रवींद्र जडेजाबद्दल बोलताना मोठी भविष्यवाणी केली आहे.
श्रीकांत म्हणाले जे काम युवराज सिंहने 2011च्या विश्वचषकात केलं होतं ते काम आत्ता रवींद्र जडेजा करेल, असं म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केलाय.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघ भारतासमोर आव्हान उभे करतील, असं भाकित देखील श्रीकांत यांनी केलं आहे.
जर भारताला पुन्हा विश्वचषक जिंकायचा असेल तर अष्टपैलू खेळाडूची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जसं 2011 च्या विश्वचषकात युवराज सिंगने करून दाखवलं होतं, असंही श्रीकांत म्हणाले आहेत.
श्रीकांत म्हणाले की, त्यावेळी भारताकडे युवराज सिंह होता. आता रवींद्र जडेजा तेच करेल जे युवराजने 2011 मध्ये केल होतं.
नुकतचं IPLच्या अंतीम सामन्यात रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर 10 धावा करत चेन्नईसाठी विजय मिळवला होता.
जडेजाने आयपीएल 2023 च्या 16 सामन्यांमध्ये 190 धावा केल्या आणि 20 विकेटही घेतले होते.
जडेजाने 174 वनडे सामन्यात 32.80 च्या एव्हरेजने 2526 धावा केल्या आहेत आणि 191 विकेट घेतल्या आहेत .
युवराज सिंहने वनडे करियरमध्ये 304 सामन्यात 36.55 च्या एव्हरेजने 8701 धावा केल्या आहेत आणि 111 विकेटही घेतल्या आहेत.
युवराजने 2011च्या विश्वचषकात 362 धावा केल्या होत्या त्यासोबत 15 विकेट सुध्दा घेतल्या होत्या. 2011च्या विश्वचषकात युवराज मॅन ऑफ द सिरीज होता. खऱ्या अर्थाने युवराज 2011 च्या वर्ल्ड कपचा हिरो होता.