MPL 2023: पाहा कोणत्या टीम खेळणार?
महाराष्ट्र प्रीमियर लीगला 15 जून पासून सुरवात होत आहे. 15 जून ते 29 जून दरम्यान MPL खेळवली जाणार आहे.
स्थानिक खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू करण्यात आलीये. जाणून घ्या कोणते संघ खेळणार?
पुणेच्या टीमला पुणेरी बाप्पा असं नाव देण्यात आलं असून ते प्रवीण मसाला यांच्याकडे त्याची मालकी आहे. या संघाचा आयकॉनिक खेळाडू हा ऋतुराज गायकवाड आहे.
कोल्हापूर संघाचे नाव कोल्हापूर टस्कर्स असून ते पुनित बालन ग्रुपच्या मालकीचे आहे. या संघाचा आयकॉनिक खेळाडू हा केदाज जाधव आहे.
नाशिक संघाचे नाव ईगल नाशिक टायटन्स असून संघाची मालकी ईगल इन्फ्रा लिमिटेडकडे आहे. या संघाचा आयकॉनिक खेळाडू हा राहुल त्रिपाठी आहे.
सोलापूरच्या संघाचे नाव सोलापूर रॉयल्स आहे आणि हा संघ कपिल सन्स एक्सप्लोसिव्हजच्या मालकीचा आहे. विकी ओसवाल हा या संघाचा आयकॉनिक खेळाडू आहे.
रत्नागिरीचा संघ जेट सिंथेसिसच्या मालकीचा आहे आणि संघाचे नाव रत्नागिरी जेट्स आहे. या संघाचा आयकॉनिक खेळाडू हा अझीम काझी आहे.
छत्रपती संभाजी नगरच्या संघाचे नाव छत्रपती संभाजी किंग्ज असून हा संघ वेंकटेश्वर इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे. या संघाचा आयकॉनिक खेळाडू हा राजवर्धन हंगरेकर आहे.