वर्ल्ड कपमध्ये मोठा कारनामा!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीला संधी देण्यात आली होती.
या संधीचा मोहम्मद शमीने पुरेपूर वापर केला अन् आपली क्षमता दाखवून दिली.
शमीने न्यूझीलंडविरुद्ध 5 विकेट्स घेतले अन् टीम इंडियाला गोलंदाजीचा दम दाखवून दिला.
न्यूझीलंडच्या यंग विलची विकेट काढताच मोहम्मद शमीने अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडला आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये 36 विकेट घेत शमीने अनिल कुंबळेच्या 31 विकेट्च्या रेकॉर्डला मागे टाकलंय.
मोहम्मद शमीने आत्तापर्यंत तीन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. त्यामध्ये 2015, 2019 आणि आत्ताच्या 2023 च्या वर्ल्ड कपचा समावेश आहे.
शमीने 12 सामन्यात 36 विकेट्स घेतल्या आहेत. शमीच्या आधी जहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांचा रेकॉर्ड आहे.
जहीरने आणि जवागल यांच्या नावावर 44 विकेट्सचा रेकॉर्ड आहे.