सध्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा धमाका सुरू आहे. अशातच भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कोण? माहितीये का?
टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात यझुवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट्स नावावर केल्या आहेत.
तर भुवनेश्वर कुमारचा दुसरा नंबर लागतो. भूवीने 87 सामन्यात 90 विकेट्स घेतल्या आहेत.
एवढंच नाही तर स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने 95 सामन्यात 80 विकेट्स नावावर केल्या आहेत.
टीम इंडियाचा संकटमोचक जसप्रीत बुमराह याने 65 सामन्यात 79 विकेट्स घेतल्या आहेत.
तर फिरकीपटू आर आश्विनने 65 आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यात 72 खेळाडूंना तंबूत पाठवलंय.
टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट अर्शदीप सिंगने 47 सामन्यात 67 विकेट्स घेतल्या आहेत.