ना रोहित ना विराट, सुरेश रैना म्हणतो...

'वर्ल्ड कपमध्ये 'हा' खेळाडू ठरणार हुकमी एक्का'

Sep 22,2023

सुरेश रैना म्हणतो...

शुभमन गिलने मागील 6 सामन्यांत 75.50 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत, त्यावर माजी भारतीय अष्टपैलू सुरेश रैनाने शुभमनचं कौतुक केलंय.

पाकिस्तान

आशिया कपमध्ये शुभमन गिल खूप चांगल्या फॉर्ममध्ये आलाय. त्याने पाकिस्तानला घाम फोडला होता, असं सुरैश रैना म्हणतो.

फिरकीपटू

फिरकीपटूंना त्याला कुठं गोलंदाजी करायची हे माहित नसतं आणि वेगवान गोलंदाजांनी चेंडू स्विंग केला नाही तर तो सरळ किंवा फ्लिकने खरोखरच चांगला खेळू शकतो.

सातत्य

शुभमन दीड वर्षांपासून सातत्यपूर्ण आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मधल्या फळीत तो झुंजला, पण त्याने ज्या प्रकारे पुनरागमन केलं, ते कमालीचं होतं.

कमबॅक

गिलने स्वत:च्या कमजोरीवर काम केलं. त्याने पुन्हा कमबॅक केलंय. आयपीएलमध्ये देखील तो चमकला होता. आता वर्ल्ड कपमध्ये त्याच्या कामगिरीवर लक्ष असेल.

हुकमी एक्का

आशिया चषकात चांगल्या धावा केल्या. त्याला मोठा खेळाडू व्हायचंय. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल टीम इंडियासाठी हुकमी एक्का बनू शकतो, असं सुरेश रैना म्हणतो.

वर्ल्ड कप 2019

रोहित शर्माने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये जशी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी शुभमन करेल, अशी आशा देखील त्याने व्यक्त केलीये.

VIEW ALL

Read Next Story