जानेवारी 2021 मध्ये अनुष्का-विराटला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे.
विराट आणि अनुष्का जवळजवळ 2 वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ते 2017 मध्ये इटलीमधील एका खासगी कार्यक्रमात लग्नबंधनात अडकले होते.
माझी बुद्धी तिच्यापेक्षा थोडी तल्लख असल्याने ती मला महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवायला सांगते, असंही विराटने सांगितलं.
याच मुलाखतीमध्ये विराटने अनुष्कासंदर्भात सांगताना, अनेकदा ती महत्त्वाच्या तारखा विसरते, असं सांगितलं.
"मी विचार करायचे की याची बुद्धी किती तल्लख आहे. मला याची मदत होईल. यामुळे फारच प्रभावित झालेले," असंही अनुष्काने हसत हसत सांगितलं.
विराटची तल्लख बुद्धी हा मला त्याच्यातील फार विशेष आणि महत्त्वाचा गुण वाटतो, असंही अनुष्काने सांगितलं.
जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो तेव्हा त्याच्या (विराटच्या) तल्लख बुद्धीने फारच प्रभावित झाले होते, असं अनुष्काने सांगितलं.
विराट आणि अनुष्का इंडियन स्पोर्ट्स ऑनर 2023 या पुरस्कार सोहळ्याला हजर होते. यावेळी त्यांनी एकमेकांसंदर्भातील काही खास माहिती दिली.
अनुष्काने विराटच्या कोणत्या वैशिष्ट्यावर आपण फिदा झालो यासंदर्भातील माहिती तिने एका मुलाखतीत दिली आहे.
दोघांची लव्हस्टोरी अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत असते. पण नुकताच अनुष्काने विराटसंदर्भात एक खुलासा केला आहे.
या जाहिरातीदरम्यानच अनुष्का आणि विराटमधील जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पहिली भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने झाली होती.
विराटच्या कोणत्या सवयीमुळे इम्प्रेस झाली अनुष्का? तिने स्वत:च सांगितलं.