French Open 2023

French Open 2023 जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचला अश्रू अनावर; रचला अविश्वसनीय विक्रम

Jun 12,2023

अंतिम सामना

रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात नोवाकनं इतिहास रचत 2023 या वर्षातील फ्रेंच ओपनच्या चषकावर आपलं नाव कोरलं. इतकंच नव्हे तर, तब्बल 23 ग्रँड स्लॅम जिंकणारा तो पहिला टेनिसपटू ठरला आहे.

फ्रेंच ओपन

तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचा बहुमान मिळवणाऱ्या नोवाकनं 34 व्या वेळेस एखाद्या ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना खेळला आहे. यासोबतच तो टेनिसपटूंच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानीही पोहोचला आहे.

आणखी एक विक्रम

नोवाकच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. हा विक्रम म्हणजे कोणतंही ग्रँड स्लॅम किमान तीन वेळा जिंकणारा तो पहिलाच पुरूष खेळाडू ठरला आहे.

कॅस्पर रुडचा पराभव

रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात नोवाकनं कॅस्पर रुडचा पराभव केला. जवळपास तीन तासांसाठी रंगलेल्या या खेळात त्यानं रुडला पराभूत केलं.

सेरेना विलियम्सशी बरोबरी

7-6 (7-1), 6-3, 7-5 अशा सेटमध्ये नोवाकनं रुडचा पराभव केला. सध्याच्या घडीला नोवाक ओपन एरामध्ये सर्वाधिक मोठ्या विजयासह सेरेना विलियम्सशी बरोबरी करताना दिसत आहे.

सर्वाधिक वयाचा फ्रेंच ओपन विजेता

36 वर्षे 19 दिवस इतक्या वयाचा नोवाक सर्वाधिक वय असणारा आणि फ्रेंच ओपन जिंकणारा टेनिसपटू ठरला आहे.

नोवाक

नोवाकच्या आधी मागील वर्षी राफेल नदालनं 35 वर्षे 11 महिने आणि 19 दिन इतक्या वयात फ्रेंच ओपन जिंकलं होतं.

टेनिसपटूंची यादी

सध्याच्या घडीला केन रोजवेल (1972च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या वेळी वय 37 वर्षे 1 महिना, 24 दिवस) आणि रॉजर फेडरर (ऑस्ट्रेलियन ओपन 2018 च्या वेळी 36 वर्षे 5 महिने आणि 7 दिवस) यांच्यामागोमाग नोवाकचं नाव घेण्यात येत आहे.

तिसरं फ्रेंच ओपन जेतेपद

नोवाकनं आतापर्यंत 2016 आणि 2021 या वर्षांमध्ये फ्रेंच ओपन जिंकलं होतं. ज्यानंतर आता 2023 मध्येही त्यानं हा बहुमान पटकावला आहे.

रोलांड गॅरोस

आतापर्यंत नोवाक जोकोविचनं 10 ऑस्ट्रेलियन ओपन, 7 विम्बल्डन, तीन युएस ओपन आणि तीन फ्रेंच ओपन असे एकूण 23 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. (सर्व छायाचित्र- रोलांड गॅरोस/ इन्स्टाग्राम)

VIEW ALL

Read Next Story