टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने वनडे वर्ल्ड कपमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली.
रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्माने 19 इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना डेव्हिड वॉर्नरशी बरोबरी केली. त्याआधी हा रेकॉर्ड सचिन तेंडूलकरच्या नावी होता.
सचिन तेंडूलकरने वर्ल्ड कपमध्ये खेळताना 20 सामन्यात 1000 धावांचा टप्पा पार केला होता.
रोहित शर्माने यावेळी सौरव गांगुलीचा 1006 धावांचा आकडा पूर्ण केला अन् सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत 1115 धावा केल्या आहेत. तर सचिनच्या नावावर 2278 धावांचा रेकॉर्ड कायम आहे.