कॅप्टन रोहित शर्मा मोडणार 'हे' पाच मोठे रेकॉर्ड!
येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वीची ही रंगीत तालिम असेल.
भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशातच कॅप्टन रोहित शर्मा आशिया कपमध्ये पाच मोठे रेकॉर्ड मोडणार आहे.
रोहितने आशिया कपमध्ये आतापर्यंत एकूण 22 सामने खेळले आहेत. आता तो आशिया कपमध्ये सर्वाधिक 23 सामने खेळलेल्या सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडू शकतो.
आशिया कपमध्ये आतापर्यंत 17 सिक्स मारले आहेत. तो यंदा शाहिद आफ्रिदीच्या 26 सिक्सचा रेकॉर्ड मोडू शकतो.
रोहितने आशिया कपमध्ये आतापर्यंत 745 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आता कुमार संगकारा आणि सनथ जयसूर्यानंतर तिसरा 1000 धावा करणारा खेळाडू होऊ शकतो.
आशिया कपमध्ये एकदिवसीय कारकिर्दीतील 10 हजार धावांचा आकडा पूर्ण करण्याची संधी असेल. अशी कामगिरी केली तर तो सहावा भारतीय खेळाडू ठरेल.
रोहितच्या नावावर तिन्ही फॉरमॅटसह जागतिक क्रिकेटमध्ये एकूण 534 सिक्स आहेत. आता तो ख्रिस गेलचा 553 सिक्सचा विक्रम मोडू शकतो.