पुण्याच्या ऋतुराजचं नशिब चमकलं
बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.
बुमराहने कमबॅक केलं असताना आता युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
येत्या 18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. अशातच आता ऋतुराज गायकवाड उपकर्णधार करण्यात आल्याने आनंद व्यक्त केला जातोय.
गेल्या तीन आठवड्यात ऋतुराज गायकवाडला दोन प्रमोशन मिळालीयेत. त्याला 16 दिवसांपूर्वी पहिलं प्रमोशन मिळालं होतं.
आगामी आशियन गेम्समध्ये ऋतुराज गायकवाडला टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. तर आयर्लंड दौऱ्यात त्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलंय.
संघात सिनिअर खेळाडू असताना ऋतुराजकडे जबाबदारी देण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलंय.
भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जितेश शर्मा, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह या युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीये.