टीम इंडियाचा उगवता तारा म्हणून मयंक यादवकडे पाहिलं जातंय. आयपीएलमध्ये चमकणाऱ्या मयंक यादवने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर सर्वांना प्रभावित केलंय.
मयंक यादवच्या कामगिरीवर शेन वॉट्सनने मोठं भाष्य केलंय. नेमकं काय म्हणाला शेन वॉट्सन?
मयंक यादवने त्याच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर नक्कीच सर्वांना आश्चर्यचकित केलंय. मात्र, त्याला टेस्ट क्रिकेट खेळवण्यासाठी बीसीसीआयने घाई करून नये.
मयंक यादव नक्कीच एक वर्ल्डक्लास गोलंदाज आहे. दोन सामन्यातच त्याने दबदबा निर्माण केलाय. तो येत्या काळात टीम इंडियामध्ये खेळताना दिसेल, असा विश्वास वॉट्सनने व्यक्त केलाय.
कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला 15 ओव्हर दिवसाला टाकाव्या लागतात आणि फास्ट बॉलरसाठी ही अवघड गोष्ट असते.
मला तरी वाटतं की सध्याच्या टप्प्यावर मयंक यादवला कसोटी क्रिकेट खेळवणं शहाणपणाचं ठरणार नाही, असं मत शेन वॉट्सनने व्यक्त केलं आहे.
मयंक यादवने आपल्या डेब्यू ओव्हरमध्येच यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जलद बॉल टाकला होता.