पाहा सुनील गावस्कर यांची कमेंट
यश अपयशाची चिंता न करता अर्जुनने सचिनसारखा खेळाचा आनंद घेतला पाहिजे आणि अर्जुनने त्याचा मेहनतीच्या जोरावर करून दाखवलं आहे, असं देखील गावस्कर यांनी म्हंटलं आहे.
वसीम- वकार, अॅम्ब्रोस-वॉल्श-बिशप, वॉर्न-मॅकग्रा, अँडरसन-ब्रॉड, मुरलीधरन याच्या बरोबरच्या अनुभवामुळे सचिनला अर्जुनची चिंता नसावी, असं देखिल गावस्कर यांनी सांगितलं आहे.
मुलाच्या डेब्यूनंतर सचिनने भावुक पोस्ट केली. सचिनने केलेल्या पोस्टवर सुनिल गावस्कर यांनी बाप लेकाला अनोख्या भाषेत शुभेच्छा देत सचिनला त्याच्या आयुष्यातील एक छान भेट मिळाली आहे, असं म्हंटल आहे.
मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपयाला विकत घेतलं होतं पण सुरवातीच्या 2 सामन्यात त्याला पर्यायी खेळाडूंमध्ये अर्जुनचा समावेश होता.
अर्जुन तेंडुलकरने काल मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये झालेल्या सामन्यात डेब्यू केला आणि मुंबईकडून गोलंदाजी केली.
सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'