1 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाची पहिली बॅच अमेरिकेला रवाना झाली. (PC- PTI)
पहिल्या बॅचमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांचा समावेश आहे. (PC- PTI)
आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर उर्वरित खेळाडू अमेरिकेत जातील. 27 मे रोजी दुसरी बॅच रवाना होणार आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळला जाणार आहे.
30 एप्रिलला बीसीसीआयने 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली होती. रोहित शर्माकडे कर्णधारपद तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलंय.
याशिवाय संघात यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह ,जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
पहिल्या सामन्याआधी टीम इंडिया 1 जूनला बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. टीम इंडियाचे लीगमधले सर्व सामने न्यूयॉर्कला खेळवले जाणार आहेत.