आता टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू घेणार निवृत्ती!
आगामी आशिया कप स्पर्धेसाठी आता टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरेल. तर हार्दिक पांड्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, संधी न मिळालेले काही खेळाडू निवृत्ती घेऊ शकतात.
आशिया कपमध्ये संधी न मिळ्याने आता वर्ल्ड कपची दारं देखील आता जवळजवळ बंद झाली आहे. अशातच 37 वर्षांचा शिखर देखील निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार निवृत्ती जाहीर करु शकतो. भुवनेश्वर गेल्या अनेक महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे.
दिनेश कार्तिकने आतापर्यंत टीम इंडियासाठी 60 टी-ट्वेंटी, 26 कसोटी आणि 94 एकदिवसीय सामने खेळला आहे. कार्तिक देखील आता निवृत्तीच्या मार्गावर आहे.
इशांत टीम इंडियातून जवळपास 2 वर्षांपासून दूर आहे. इशांतने 105 कसोटीत 311, 80 वनडेत 115 आणि 14 टी 20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत.
केदार जाधव हा देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. केदारने आतापर्यंत 73 वनडे आणि 9 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय.