पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने वयाच्या 20 व्या वर्षी त्याची मामेबहिण नादिया सोबत निकाह केला. ते दोघे जवळ जवळ 19 वर्षं एकत्र आहेत. नादिया खूपच लाजाळू स्वभावाची आहे, शाहिद आफ्रिदीच्या मॅचेस दरम्यानही तिला कधी पहिले गेले नाही.
शाहिद आफ्रिदीने 22 ऑक्टोबर 2000 साली नादियाशी लग्न केलं.
नादिया,शाहिद आफ्रिदीच्या सख्या मामा ची मुलगी आहे. या दोघांना अक्सा, अंशा, अजवा, असमारा आणि अरवा अशा 5 मुली आहेत.
बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, त्याच्या काकाची मुलगी सामिया परवीन हिच्याशी लग्नबंधनात अडकला.
या दोघांनी 2019 साली मार्च महिन्यात लग्न केलं.
बांग्लादेश क्रिकेट संघातील युवा खेळाडू मोसद्देक हुसैनने 2012 साली आपल्या काकाच्या मुलीशी विवाह केला.
मोसद्देक हुसैन त्याच्या वैयक्तिक जीवनाला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. त्याची पत्नी शरमीनला त्यानं हुंड्यासाठी त्रास दिल्याचा मोसद्देकवर आरोप होता. आणि याचमुळे त्याला त्याचे संघातील स्थान गमवावे लागले.
1996 साली पाकिस्तानी क्रिकेटर सईद अनवरने त्याच्या काकाची मुलगी लुबना सोबत निकाह केला होता. लुबना पेशाने डॉक्टर आहे. योगायोगाने हे तेच साल होते जेव्हा सईद टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावत होता.
अनवरचे जीवन आनंदात चालले होते तोच अचानक साल 2001 मध्ये त्याच्या मुलीचे अकस्मित निधन झाले. त्यानंतर हा खेळाडू त्याचा खेळ सुरू ठेवू शकला नाही आणि 2003 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने निवृत्ती घेतली.