भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली याने 54 धावांची खेळी केली.
विराट कोहलीने वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 धावा करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अंतिम सामन्यात 3 धावा करून विराट कोहली एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले असून वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 1767 धावा पूर्ण केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग 1743 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
तर एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 2278 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर चौथ्या स्थानी रोहित शर्माचं नाव आहे. त्याने वर्ल्ड् कपमध्ये 1575 धावांची खेळी केली आहे.