इंदूरच्या टी-20 मध्ये 'हा' धोकादायक खेळाडू करणार कमबॅक

Jan 13,2024


IND vs AFG भारताने पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. दरम्यान या सामन्यात एका स्टार खेळाडूंचं कमबॅक होणार असून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई होणार आहे.


अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा किंग कोहली उपस्थित नव्हता. मात्र इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात कोहली खेळणार आहे.


रोहित सेनेने अफगाणिस्तानच्या टीमचं टी-20 सामन्यात पराभव करत 1- 0 अशी आघाडी घेतलीये. अशा स्थितीत इंदूरमध्ये होणाऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवून सिरीज जिंकण्यावर टीमची नजर असणार आहे.


2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावलं होतं.


हे शतक कोहलीच्या T20 आंतरराष्ट्रीय करियरमधील पहिलं शतक होते. या फॉरमॅटमध्ये कोहलीच्या नावावर फक्त एकच शतक असून विराटने त्या सामन्यात 122 रनची नाबाद खेळी खेळली.


विराट कोहली हा जगातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे.


विराटने आतापर्यंत 115 टेस्ट सामन्यांमध्ये 4008 रन केले आहेत. या फॉरमॅटमध्ये 4000 पेक्षा रन करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.


विराट कोहली या फॉरमॅटमध्ये भारताकडून शेवटचा टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनल मॅचमध्ये खेळला होता.


त्यानंतर तो एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. टी-20 फॉरमॅटमध्ये कोहलीच्या नावावर 37 अर्धशतके आहेत.

VIEW ALL

Read Next Story