एशियन्स गेम्समध्ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बांग्लादेशचा 9 गडी राखून पराभव केला.
या विजयाबरोबरच आता भारताचं आणखी एक पदक निश्चित झालंय. टीम इंडिया गोल्ड घेऊन येईल, हे आता जवळजवळ निश्चित मानलं जातंय.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्यात तिलक वर्माने 26 बॉलमध्ये धमाकेदार अर्धशतक ठोकलं.
अर्धशतक झळकावल्यानंतर तिलक वर्माने खास अंदाजात सेलिब्रेशन केलं.
फिफ्टी पूर्ण झाल्यानंतर तिलक वर्माने जर्सी उचचली अन् टॅटू दाखवला आणि आकाशाकडे बघत हात जोडले.
अर्धशतक झाल्यानंतर केलेले सेलिब्रेशन माझ्या आई वडिलांसाठी होतं. मागील काही सामने माझ्यासाठी चांगले गेले नव्हते. त्यामुळे मी प्रेशरमध्ये होतो.
माझ्या अंगावर असलेला टॅटू माझ्या आईवडिलांचा आहे. मी त्यांना वचन दिलं होतं की, मी अर्धशतक करूनच येईल, असं तिलक वर्माने सामन्यानंतर सांगितलं.
आशिया कपमध्ये तिलक वर्माला पूरेशी संधी मिळाली नाही. त्यावेळी संधी मिळाली तेव्हा त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, आता तो पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे.