रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली होती. मात्र, फायनलमध्ये विजय मिळवता आला नाही.
रोहित शर्माच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अविश्वनिय प्रदर्शन करून सर्वांनाच थक्क केलं होतं.
मात्र, आता वर्ल्ड कप संपला आहे. त्यामुळे आता प्रथापरंपरेनुसार नवा खेळाडू रोहित शर्माची जागा घेईल.
रोहित शर्मानंतर तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे, जे टीम इंडियाची कमान सांभाळू शकतात.
टीम इंडियाचा सध्याचा उपकर्णधार केएल राहुलला वनडे संघाचं नेतृत्व दिलं जाण्याची शक्यता आहे. मैदानात नेहमी कुल राहणाऱ्या राहुलने अनेकदा टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलंय.
बीसीसीआयपुढे दुसरा पर्याय असेल तो हार्दिक पांड्या याचा... हार्दिक सध्या टी-ट्वेंटीची भार सावरतोय. मात्र, त्याला वनडे संघाची जबाबदारी देणार का? हा देखील प्रश्न आहे.
तिसरा पर्याय असेल तो जसप्रीत बुमराहचा. एखादा गोलंदाज कर्णधार देखील वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो, याची प्रचिती पॅट कमिन्सकडे पाहून आली असेल. त्यामुळे जस्सीकडे कर्णधारपद आल्यास आश्चर्य वाटायला नको.